Hydration Bladder हे आपल्यासाठी आज नवीन नाही आहे. सोप्पा भाषेत सांगयचे तर पाठीवरील पाण्याची पिशवी सुरवातीला याचा वापर जरी सायकल चालताना होत असला तरी आता याचा वापर ट्रेक दरम्यान सहज होताना दिसतो आणि ते स्वागतार्हय आहे. पण त्याची स्वच्छता करणे हा एक मोठा त्रासदायक विषय आहे. मग पिण्याच्या पाण्याला येणार रबरी वास असो किंवा शेवाळ्याचा साचलेला थर असले. हे सगळे रोगाला आमंत्रणच आहे.  म्हणून HydrationBladder ची स्वच्छता कशी करावी या बाबत थोडे:
१.      थोडे कोमाट पाणी आणि भांडी धुण्याचा साबण (Liquid soap ) मिसळून त्याने साफसफाई करता येते.शेवळ्याचा थर असेल तर हे करावं.
२.      घरगुती सोप्पा उपाय म्हणून अर्धे कापलेल लिंबू (बिया काढून ) टाकावे आणि त्यात पाणी भरून काही वेळासाठी ते बंद करून ठेवावे. नंतर ते वाळवून ते कोरेडे करून ठेवावे.
३.      सफेद विनिगर चा वापर सुद्धा साफ करण्यासाठी करता येतो त्यासाठी १ चमचा विनिगर टाकून पाणी भरून ते काही मिनिटासाठी ठेवावे.  नंतर ते वाळवून ते कोरेडे करून ठेवावे.
४.      वळवण्यासाठी तुमच्या कडे फार कमी वेळ असेल तरhair dryer चा वापर करू शकता मात्र त्याची उष्णता कमी करून Bladder ला कुठेही स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर ते वितळू शकते.
५.पूर्ण पणे कोरडे करण्यासाठी ते उलटे लटकून टीशु चा वापर करून उरले सुरले पाणी काढता येईल.
६.Hydration Bladder निर्जंतुक ठेवण्यासाठी वापर नसतात ते वाळवून फ्रीज मध्ये ठेवणे उत्तम जेणे करून त्यात कोणतेही जंतू अथवा शेवाळ जमणार नाही.
(टीप: वरील दिलेली माहिती अनुभवातून आहे. बाकी निर्माते साफ करण्यासाठी गोळ्या आणि ब्रशची विक्री करत असतात त्याचा वापरही करू शकता)