नुकताच कावनई किल्ल्यावर जाण्याचा योग्य आला.. वाटेत सुरवातीची काही वेळ नाकावर रुमाल आज पायाखाली घाण या पासून वाचवतच जावे लागेल..विद्या बालन ओरडुन थकली पण गावकरी काही ऐकायला तयार नाहीत.

असाच परिणाम भविष्यात किल्ला वर दिसून येईल आणि मग सुरु होईल. हगणदारी मुक्त किल्ले योजना…

किल्ल्यावर वाढती लोकांची संख्या आणि पर्यायाने उपाय योजनांचा अभाव त्यामुळे सध्या जरी हा विषय कोणी गांभीर्याने घेत नसला तरी भविष्यात याची अनुभूती लवकरच येईल. एकच किल्ल्यावर सध्या २००-३०० लोक  दिसून यायला लागली आहेत. संधान दरीत तर म्हणे ४००लोक देखील एका वेळी होती..इतकी लोक राहण्याचं सोडा पण सकाळी निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जाणार तरी कुठे जातात.

यासाठी उपाय तरी काय या बद्दल अनेक मतभेद असू शकतात.

किल्लावर संडास बांधणे हा उपाय होईल का तर माझा मते मुळीच नाही….कित्येकांना पटणार नाही पण काही गोष्टीच विचारात घायला हव्यात.
१. देखभाल कोण करणार.
टाकी साफ करण्यापासून ते स्वच्छते बाबत सगळे आधीच उदासीनता सर्वनद्यात आहेत…
२. पाण्याची उपलब्धता
मुळात पावसाळा आणि त्या नंतरचे  महिने सोडले तर पाण्याची वानवा असते. त्यात स्वतःचे धुवावे आणि संडास पण धुवायचे म्हणजे पाणी जास्त प्रमाणत वापरले जाणार.
3.एकदा का हि घाण झाली कि मग सगळेच आटोपले.
(ज्या ठिकाणी गिर्यारोहकानं व्यतिरिक्त देखील लोक पोहीचात अशा ठिकाणी हा उपाय प्रोयोगीक तत्वावर चालू शकतो…पण खूप काही सफल होईल याबाबत मात्र शशांका आहे.)

हे झाले काय करू नये या बाबत आता विचार करूयात काय करावे या बाबत.

माझा मते आपण निसर्गात जातो त्यावेळी सगळ्या गोष्टी नैसर्गिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी  leave no trace  चे नियम पडताळले जाऊ शकतातजे आपल्याकडे फक्त कचरा टाकू नये इतकेच मर्यादित आहेत असेच दिसुन येते.

1. आपली घाण आपण परत घेऊन जाणे. विदेशात कुत्र्याने जरी रस्तात घाण केली तरी त्याची विस्टा मालकाला साफ करावी लागते. त्याच प्रमाणे विदेशात गिर्यारोहक सोबत विष्टा उचलण्यासाठी विशेष पिशवीचा वापर करतात आणि आपली घाण परत घेऊन जातात.. काही भागात तर हे करावेच लागते.
( आपल्याकडे हे होईल किंवा आपली इतकी मानसिकता सुधारले असे स्वप्न देखील कोणाला पडणार नाही).

2. खड्डा करून कार्य सिद्धीस नेणे.
मांजराला कधी पहिले आहे विधी करताना.. मुळातच निसर्गाने त्याला हि कला दिली आहे..त्याच पद्धतीचा अवलंब करायची आज गरज आहे.

त्यासाठी खालील बाबींचा विचार करावा

·         जागेची निवड करताना ती येण्याजाण्याची वाट तर नाही आहे ना याची खातरजमा करावी.

·         पाणी,वाटराहण्याचे ठिकाण या पासून २००फूट अंतर ठेऊन कार्य सिद्धीस न्हावे.

·         खड्डा खणताना ६ ते ८ इंच खोल तर ४ ते ६ इंच व्यासाचा असावा.

·         आपले काम झाले कि माती ने झाकून टाकावे.

·         काही जण हल्ली पेपरचा वापर करतात तस्सम कागद हे सफेद (बिना कलरचे)सुगंधी नसावेत.
(माझा माते अशा कामासाठी झाडाची पानेच उत्तम ठसरतील)

नोट: सांधण घळी सारख्या ठिकाणी दगडी भाग असल्याने अश्या पद्धतीचा वापर करूच शकत नाही अशा वेळी दगडा खाली आपल्या विधी करू शकतो. पण पाण्याच्या प्रवाहा पासून दूर असणे गरजेचे. पाण्याचा तळयाच्या वरचा बाजूस न जाता खाली जाणे उत्तम.

मुलींसाठी: मुलींनी वापरायचा गोष्टी जमिनीत गडू नये कारण प्राणी वासाने उकरून काढू शकतात. त्यामुळे त्यापरत घेऊ जाण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवी सोबत ऍल्युमिनियम फॉईलला वापर करू शकता.

हल्ली संडास तंबू देखील बाजारात उपलब्द आहेत पण हे प्रकरण थोडे खर्चिक ठरेल. त्यामुले जास्त दिवसाच्या मुक्काम वेळी आडोसा म्हणून ताडपत्रीचा वापर करता येईल.

अशा पद्धतींचा वापर केल्यास विष्टा कोणाच्या संपर्कात येणार नाही त्यामुळे स्वतःलातिथल्या वन्य जीवनालाकीटकांना पर्यायाने निसर्गाला अनेक रोगांपासून आपण वाचवू शकतो. पाण्यापासून दूर राहिल्यामुळे माणसासोबत तिथल्या प्राण्यांना सुद्धा निरोगी ठेवता येते.

मी काय इतक्यात परत या ठिकाणी येणार नाही त्यामुळे काय फरक पडणार अशी मानसीकता बदलायला हवी. हळू हळू का होईना पण अशा गोष्टीचा स्वीकार करायला हवा. अन्यथा हागणदारी मुक्त किल्ले हि योजना दूर नाही.