मे महिना म्हणजे आम्हा ट्रेकर मंडळीच्या घरातले जरा खुश असतात कारण बाहेर सूर्य आग ओकत असतो त्यामुळे आम्ही घरीच आणि गेलोच कुठे तर एखाद्या समुद्र किल्लावर कुटुंबांसहित भटकायला जाणार हे त्यांना माहित. पण गेली कित्तेक वर्ष डोक्यात अडकून पडलेली हरिश्चंद्र गडाची नळीच्या वाटेची मोहीम काही स्वस्त बसू देत न्हवती. पण मे महिना त्यासाठी योग्य नाहीच हे लक्षात होते. कारण संपूर्ण वाट कातळातून जाते आणि उन्हात कातळ एखाद्या तव्या प्रमाणे तापलेले असतात. पण एकदा का डोक्यात किडा शिरला मग मात्र माघार नाही. सोबत्तीला जर ललित, अलोक, मल्हार, सुयश आणि लक्ष्मण सारखे सोबतीला असले कि मग कोण रोखणार आम्हाला हे निश्चित हा अतीच आत्मविश्वास.
रात्री कल्याण- मुरबाड पासून सुरु झालेला प्रवास पायथ्याचे गाव म्हणजे बैलपाडाला प्रवास करून संपला. रात्री एकच्या सुमार भयाण शांततेत गावातल्या कुत्रानी आमचे जंगी स्वागत केले. त्यातून सुटका करून गावातली आश्रम शाळा गाठली. पोर्णिमा नुकतीच होऊन गेलेली त्यामुळे अगदीच लक्ख  चंद्र प्रकाशात झोपायची संधी साधून आम्ही देखील बाहेरच पथाडी पसरली. झोपताना समोर दिसणार कोकण कडा सतत हिणवत असल्याचा भास होत होता. त्यामुळे उगाच दुषणे देत कसला चिंदी ट्रेक आहे असे बोलत आमच्या सगळ्या फुशारक्या सुरु होत्या. सकाळी लवकरच ट्रेक सुरु करणे गरजेचे होते कारण दुपारी जर नळीमध्ये थांबले तर भट्टी सर्दुश परीस्तीती असणर हे नक्की होते.
सकाळी गावात उरकणी आटपून आम्ही नळीच्या वाटेला लागलो. खालून पाहताना नळी एकदम भायवहः वाटत होते. दोन्ही बाजूला काळात भिंती आणि मधून वाहणारा दगडांचा धबधबा. रात्री हिणवणारा कोकण कडा आज आपण किती खुजे आहोत याची सतत जाणीव करून देत होता. मजा मस्ती करत आम्ही हि ट्रेक करत होतो. पहिला कातळ टप्पा पार झाला आणि हळूहळू भट्टी गरम होऊ लागली. घाम आणि वातावरणातील दमटता यामुळे वेग तर कमी झाला पण थकवा ही जाणवू लागल होता. पण नळी काही संपायचे नाव घेत न्हवती. एरवी धावत पाळत ट्रेक करण्यात माहीर असलेली आमची मंडळी आज मात्र कासवाच्या चालीने ट्रेक करत होती.
सोबतचे पाणी अगदीच रसातळाला गेले होते. अजून किती पल्ला गाठायचा आहे याचा अंदाज येत न्हवता. सकाळी आठ वाजता सुरु केलेला ट्रेक संध्याकाळचे चार वाजले तरी संपायचे नाव घेत न्हवता. त्यात पाणी नाही म्हणून पोटात काही गेले हि न्हवते. त्यामळे अधिकच जीवाचे हाल सुरु होते. संध्याकाळी साडेचार वाजता कोकण कड्यावर पाय ठेवला आणि हायसे वाटेल.
आत्ता एक आधार होता तो म्हणजे भास्करचा त्यानेही गरम गरम माग्गी खाऊ घातली आणि दुषणे द्यायला सुरवात केली. तुम्ही वेडे झाला आहात का? मे महिन्यात कोणी या वाटेन येते का? कारण आमचा ट्रेक तब्बल नउ तासाचा झाला होता. वाटेल सतत पडणारे दगड आणि अजिबात पाणी नाही त्यात वरून आग ओखाणारा सूर्य हे सगळेच विरोधाला ठाकलेले घटक. पण आत्ता सगळे आलबेल होते.
आजची रात्र कोकण कोकण कड्याच्या सोबत काढून सकाळी पाचनईचा सोप्पा प्रवास करण्यासाठी पाचनई पोहोचलो. सकाळी दहाची बस पकडून राजूर गाठायचे होते. पण कालचा ट्रेक कमी कि काय म्हणून आज बस आलीच नाही त्यामुळे पुन्हा एकदा उन्हात तब्बल पाच किलोमीटरची पायपीट वाटेला आली. मात्र हा ट्रेक लक्षात राहिला तो पाचनई मध्ये एका आजीला जेव्हा कळले आम्ही नळीच्या वाटने जेव्हा ट्रेक केला तेव्हा टूक्कार पोर म्हणून नामकरन केले त्यामुळेच.