डांग्या या नावातच एक आजारपण आहे या सुळक्याच्या पोटातील पाणी प्यायले कि डांग्या खोकला बरा होतो असे येथील लोकांचा समज आहे. नाशिक जिल्हात अनेक सुळके प्रस्त्रारोहाकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे त्यात डांग्या सुळका अग्रगण्य म्हणावा लागेल. याचे कारण हि तसे आहे. या विभागत अनेक सुळके जोडीने उभे आहेत पण डांग्या एकला चलो रे नारा देत आपले वेगेळे पण सिद्ध आला आहे. गाडी रस्ताने या विभागात फिरताना चहुबाजूने विलक्षण रूप अनुभवता येते. म्हणूनच या सुळक्यावर अनेक मोहिमा आखल्या गेल्या.

पण मी मात्र या सुळक्याचा फंद्यात न पडण्याचे मनाशी पक्के केले होते. याचे कारण होते या सुळक्याशी माझी झालेली पहिली ओळख.  मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ८० फूट दरीत कोसळून मुंबईतील मुलुंडमधील ​गिर्यारोहक संदीप पाताडे (२१) याचा मृत्यू. या वेळी एकाच्या मृत्यू सोबत चार जण गंभीर जखमी जखमी झाले होते या बचाव कार्यात माझा सहभाग होता. त्या दरम्यानच्या आठवणी मन सुन्न करणाऱ्या होत्या त्यामुळे डांग्या परत नाही हे मनाशी अगदी पक्के केले होते.  लक्ष्मण मात्र माझ्या या विचारांच्या अगदी विरुद्ध होता. म्हणूनच माझ्या मनातील भीती दूर करण्यासाठीच त्याने डांग्या सुळका सर करूया म्हणून तगादा लावला होता. अनेकदा नकार घंटा ऐकूनही त्याने पाठकाहि सोडली नाही.

शेवटी डांग्या सुळक्याची मोहीम नक्की झाली. रात्रीच निघून पायथा गाठायचा त्यामुळे लक्षण, मी, विश्राम आणि अक्षय असे मुंबईहून निघालो. या वेळी आमच्या सोबत किरण सुद्धा येणार होता. लक्ष्मण सोबत प्रगत गिर्यारोहण प्रशिक्षणामध्ये असणारा किरण डांग्याच्या पायथ्याला राहणारा. त्याचे बालपण अगदी डांग्याच्या आजूबाजूला गेलेले. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा यावेळी आम्हाला नक्की होणार होता. रात्री किरणच्या घरी मुक्काम करून सकाळीच डांग्याकडे कूच केले.

गावापासूनच डांग्या आपले दर्शनदेतच होता. डांग्याच्या पायथ्याला जाऊन चहुबाजूने डांग्याचे दर्शन घेतेल. सहा मधमाशांची पोळी डांग्याच्या भीतीवर लटकत होती. त्यांचा भूनभूण्याचा आवाज काही अंतरावर अंतर्वरून ऐकू येत होता. आम्ही मात्र हि जोखीम घेण्यासाठी पूर्ण तयार होते. सुळके चढाईची मार्ग पाठीमागून होता तरी धोका कमी न्हवता.

चढाई तीन टप्पा मध्ये करायची होती. पहिला कान्गोर्याचाअंदाज घेतला. लक्ष्मणे माझाकडे नेतुर्त्वाची जबाबदारी दिली आणि स्वता माझी सुरक्षा दोरी हातात घेऊन मार्गदर्शन करू लागला. पहिले चाळीस फुटाचे आरोहण सोप्पे होते पण माझासाठी डांग्या हेच कठीण होते म्हणून प्रत्येक पाउल निट जपून टाकत होतो. वाटेल एक झाडीची मुली सोडली तर कुठेच सुरक्ष्या दोरी ओवता येत न्हवती. त्यामुळे मुक्त चढाई करूनच पहिला कंगोर गाठला. कंगोर प्रशस्थ होता पण दोर बांधण्यासाठी कुठेच संधी दिसत न्हवती. त्यावेळी आधीच्या आरोहाकानी वापरलेला एक खिळा दिसला. त्याची नित तपासणी करून स्वताला तिकडे सुरक्षित करून घेतले. मागाहून बाकीचे पण कांगोर्यावर येईन पोहोचले.

पण आमच्या होत असलेल्या हालचाली मुळे कदाचित मधमाश्या आजूबाजूला फिरू लागल्या होत्या. ठरल्याप्रमाणे सगळे निपचित पडून राहिलो. पण त्यांचा थव्याचे काळे ढग पाहून माझी चांगलीच मात्र गाळण उडाली होती. यापुढे मला काही नेतुर्त्व करणे जमणार नाही हे मी लक्ष्मणला अगदी ठामपणे सांगून टाकेल. सुळके आरोहणात शारीरिक क्षमते सोबतच मानसिक स्थिती सुद्धा महत्वाची ठरते. स्वतावरच विश्वास जेव्हा डळमळीत होता असे जाणवले  त्यावेळी त्यावेळी माघार घेण उत्तम हे लक्षात होते.

या पुढचे आरोहण लक्ष्मण करणार होता.  दुसरा टप्पात पहिले २० फुटाचे काळात भिंत पार केल्या नंतर एक वळसा घेऊन  मातीचा घसरणी वरून चढाई करयची होती. वाटेत मुळीना दोर ओऊन स्वताला सुरक्षित करत लक्ष्मण दुसऱ्या कांगोर्यापाशी पोहोचला. या नंतर खरी कसोटी लागणार होती. पुढचा टप्पा हा सरळ आकाशाला भिडणार आणि निखळणारया दगडांचा होता. प्रत्येक दगड नित चाचपून पाहावा लागत होता. लक्ष्मणच्या उंचीचा फायदा घेत लक्ष्मणेन नवीन मार्ग निवडला आणि तो टप्पा लीलया पार केला. त्याच्या या चढाईचे कौतुक करावे तितके कमीच होते. पुढे मातीची घसरण आणि सुळक्याचा माथा. लक्ष्मण माथ्यावर पोहोचतात जीवात जीव आला. मागून आम्हीही माथ्यावर येऊन पोहोचलो.

डांग्याचा माथा गाठणे म्हणजे माझ्यासाठी भीती वर मात करणे होत. कदाचित या भीती वर मी विजय मिळवलाही असेन पण आजही डांग्या पण त्या बचाव कार्याच्या आठवणी मात्र तश्याच ताज्या आहेत.