आपट्याच्या झाडाचा प्रत्येक भाग आयुर्वेदात उपयोगात आणला जातो म्हणून कदाचित त्याला सोन्याचे झाड म्हणून ओळख मिळाली असेल. पण याच झाडाची दसऱ्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तोड होते आणि ती सध्याचा काळात परवडणारी नाही. कारण या झाडांची नवीन लागवड काही होताना दिसत नाही. म्हणूनच ही झाडे नामशेष होण्याच्या टप्पावर येऊन पोहोचली आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या ह्या सोन्यातही आज भेसळ होऊ लागली आहे. हो यातही भेसळ!!!

सध्या बाजारात जी आपट्याच्या पानाच्या बदल्यात त्याच कुळातील “कांचन” वनस्पतीची पाने विकली जातात आणि आपणही ती घेतो मग मोठी मोठी पाने मिळाल्याचा आनंदही मानतो.

तसा या दोन्ही पानात फारसा फरक नाही आपट्याची पाने कांचन पेक्षा लहान आणि जाड असतात तर कांचन मोठ्या आणि पातळ पानांचा ठेवीदार. आपट्याचा पानाचा आकार खालील बाजूस गोल तर कांचन थोडा लाबुडका असतो.

दोन्ही पानांच्या आकारातील फरक

बर हे सांगण्याचा उद्देश हाच की भविष्यात दसर्याला आपट्याची पाने वाटायची असल्यास आपट्याचे एखादे झाड लावले तर या सोन्याच्या झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही.

तरी पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा !!!