alt="Travel after lockdown"

लॉकडाउन नंतरची भटकंती

सुमारे दोन महिन्यांपासून आपण सर्वजण घरात अडकून पडले आहोत. खरंतर हा मौसम आपल्यासारख्या भटक्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो परंतु या कोरोनामुळे आपण घराच्या चार भिंतीमध्ये अडकून पडलो आहोत… केवळ आपणच नाही तर संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झालेत…काही ठिकाणी व्यवहार हळूहळू सुरू होत असले तरी कोरोनाची टांगती तलवार आपल्यावर आहेच… मात्र जिद्द आणि सकारात्मकता हा आपल्यासारख्या भटकंती करणाऱ्यांचा मूळ स्वभाव असल्यानं या कठीण प्रसंगातून आपण नक्की बाहेर पडणार आणि पुन्हा एकदा निसर्गात फिरायला सुरुवात करणार हे नक्की…

जेव्हा सर्व काही सुरळीत होईल त्यावेळी आपल्याला अधिक जबाबदारीने भटकंतीची सुरवात करावी लागणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे. ‘आत्मनिर्भर’ तर आपण आधीपासून होतो परंतु आता त्याचे काटेकोरपणे पालन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे काही मुद्दे नक्की लक्षात ठेवा…

भटकंतीच्या जागेची निवड 

 • आपण ज्या ठिकाणी भटकंतीला जात आहोत त्या जागेची सध्याची स्थिती काय आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे .
 • त्यासाठी गावकरी, पोलीस यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलून मगच गावात जाणे योग्य. 
 • पुढल्या काळात पूर्वपरवानगी हा भटकंतीचा मुख्य भाग होईल जेणेकरून एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राखता येईल. 
 • एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथं गर्दी आहे असं जाणवलं तर आजूबाजूला दुसरे ठिकाण असेल तर तिथं जा.अर्थात यासाठी त्याठिकाणी जाण्यापूर्वी तिथली सगळी माहिती तुम्हांला असणं गरजेचं आहे.
 • जवळची ठिकाणे भटकंतीसाठी निवडावी, कदाचित सुरुवातीच्या काळात एक दिवसाची परवानगीच मिळू शकेल. 
 • सार्वजनिक वाहतूक टाळता आली तर उत्तम जेणे करून कमीत कमी लोकांचा संपर्क येईल 

सवंगडी निवडताना 

 • सवंगडी परिचयाचे असणे केव्हाही योग्य. कारण त्यांचे कामाचे स्वरूप, त्यांचा दिनक्रम याची माहिती आपल्याला असते. 
 • संस्थात्मक भटकंती योग्य पर्याय असेल तेंव्हा माहितीच्या संस्थाबरोबरच जावे.
 • आजारी असल्यास भटकंती टाळावी 
 • जितके स्वतःला सुरक्षित ठेवता येईल ते उत्तम आधीच आरोग्य आणि मदत विभागावर मोठ्या प्रमाणात ताण आहे त्यामुळे त्यांच्यावर अजून ताण देणे योग्य नाही.

सोबत घेऊन जायच्या गोष्टी

 • सध्या स्थितीत मूलभूत गरजांमध्ये मास्क आणि सॅनीटाइजर याची भर पडली आहे. त्यामुळे भटकंतीमध्ये हे असणे हे काळाची गरज आहे. . 

(मास्क लावून चालणे  आपल्या रांगड्या सहयाद्री जरा कठीण आहे. पण त्यासाठी योग्य अंतर ठेवून चालावे लागेल) 

 • पाण्याची बाटली, चमचा,ताट वाटी तूर्तास तरी एकमेकाचे वापरणे टाळावे. 
 • कदाचित पूर्वी सारखी गावात जेवणाची सोय होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे गावकऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतः सोबत खाण्याच्या समान घेणे योग्य. 

शेवटचे पण महत्वाचे -लिव्ह नो ट्रेस

लिव्ह नो ट्रेसचे नियमांचे काटेकोरपणाने पालन केले तर भविष्यात भटकंती उत्तम व्हायला मदत होईल. 

१. योजना आखा आणि त्यासाठी उत्तम तयारी करा 

२. भटकंतीमध्ये वेगळ्या वेगळ्या घटकांमधून प्रवास होईल त्यावर तुमचा कमीत कमी प्रभाव होईल याची काळजी घ्या मग ते घटक अगदी डांबरी रस्ता असो किंवा पायवाट.

३. तुमच्या मार्फत होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. मग तो विघटनशील असला तरी

(खाली दिलेल्या  लिंकवर जाऊन डोंगराच्या भटकंती मध्ये निसर्गाच्या हाकेला योग्य हाक कशी द्यावी याची माहिती दिली आहे. ती नक्की वाचा

४. भटकंतीमध्ये आठवणी आणि सध्याच्या काळात फोटोशिवाय काहीच सोबत आणू नका आणि काही ठेवू नका.

५. निसर्ग संपत्तीचे सगळ्यात जास्त नुकसान हे आगीपासून होते त्यामुळे गरज नसल्यास शेकोटी सारखे प्रकार टाळावेत.

६. प्राणी, पक्षी आणि इतर सजीवांना जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका एका मानवाला. त्यामुळे त्यांचा आदर केलाच गेला पाहिजे. 

त्यामुळे तिथल्या  नागरिकांना योग्य तो मान द्या.

या  सगळ्या गोष्टींचे योग्य पालन केले तर भविष्यात भटकंती करणे शक्य आहे.अन्यथा……

तुम्हांला काय वाटतं… नक्की सांगा!!