सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग म्हणजे थेट इगतपुरी पासून ते थळघाटाच्या पूर्वेकडील परिसर जाते. याच रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसुबाई शिखर समस्त गिरीप्रेमींना कायमच खुणावत असते. पुढे याचे दोन भाग होतात एका भागात अलंग, मदन, कुलंगसारखे गिर्यारोहकांना आकर्षित करणारे किल्ले […]
आजोबांची शेंडी
ही भटकंती आहे २०१४ सालची… मुंबईपासून साधारण १३० किलोमीटवर शहापूरनजीक आजोबा किल्ला वसला आहे. घनदाट जंगलला सोबत सापांचा वावर हे याचे खास विशेष. याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव […]
प्री वेडिंगचं वावटळं आत्ता गडकिल्ल्यावरही
चिखलदरा भटकंती दरम्यान गाविलगड पाहण्याची संधी मिळाली. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडांनी घेतला. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे […]
गडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई
कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत होती… नजरेच्या टप्प्यात लक्ष्य दिसत होते… ते गाठण्याची जबर इच्छाशक्ती असल्यामुळे उन्हाची पर्वा न करता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती… आमची ही जिद्द पाहून सूर्य डोक्यावर येऊन स्तब्ध झाला होता. कदाचित त्यालाही आमचं यश पहायचं […]
हडबीची शेंडी
मित्रांनो, ही गोष्ट आहे, अंकाई-टंकाई किल्ल्याजवळच्या ‘हडबीची शेंडी’ या सुळक्याची. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी पाहिली, त्याच वेळी त्याच्या शेजारच्या त्या सुळक्याने लक्ष वेधून घेतले होते. हा सुळका कधीतरी सर करायचा हा निश्चय आम्ही त्या वेळी केला होता. या […]
स्टोक कांगरीची चढाई
सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरत असताना हिमालय सतत साद घालत होताच. त्याच्या हाकेला प्रतिसाद देणं शक्य होत नव्हतं. मात्र यंदाच्या मोसमात कसंही करून हिमालयात जायचं असा आमचा निश्चय होता. त्यानुसार आम्ही सर्वांनी ऑफिसमधील सुट्टीच्या तरतुदी करत लेहमधील २० हजार फुटांवरील ‘स्टोक कांगरी’ची […]
स्टोकच्या वाटेवर…
लेह लडाख प्रत्येकाच्या आयुष्यातील ड्रीम ठिकाण. बुलेट घ्यावी आणि लडाखवारी करून घावी हे जणू समीकरण झाले आहे. पण आमची भटकंतीची व्याख्या थोडी वेगळीच.डोंगरदऱ्यात भटकण्यासाठीच आमचा जन्म असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अगदी लहान वयातच काकामुळे हिमालयाची तोंडओळख झाली. पुढे अनेकदा […]
तिचे माझे ब्रेकअप
१३ वर्षांपूर्वी पाहताच क्षणी प्रेमात पडलो मी तिच्या. तेव्हा ‘RHTDM’ हा चित्रपट फारच गाजला होता. याची जादू इतकी झाली की चित्रपटातील हिरोसारखे आपल्या सोबतही कोणी असावी, अशी स्वप्न पडू लागली. स्वप्नात ती दिसायची, रस्तात तिच्यासारखी कोणी दिसली की मी थांबून तिच्याकडे […]
नाणेघाटचा राजकीय रंग
नाणेघाट हा सगळ्यांसाठी एक सुखद अनुभव असतो. लांबवर पसरलेले पठार. बाजूच्या डोंगराचा मुठीसारखा दिसणारा आकार, त्याच मुठीतून अवकाशाला गवसणी घालायला सरसावलेला नानाचा अंगठा. पलीकडे जीवधन किल्ला आणि त्यालाच बिलगून असणारा वानरलिंग सुळका. प्रत्येक वेळी नाणेघाटात न चुकता भेटणारा चापडा म्हणजेच […]
माळशेजचा वाटसरू फंट्यां
नवरा , नवरी , करवली, शेंडी, टोक आणि त्यांचा सोबत जोडलेले तिथले ठिकाण अशी बरीच नावे सुळक्यांच्या बाबतीत परिचयाची आहेत. पण फंट्यां हे नाव का असा प्रश्न मला आजही सतावत आहे. नावातच फन असेलला हा सुळका चढाईत किती मजा आणतो […]